कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी ५० हजार रुपये डिपॉझिट घेणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करणार; अरोग्यमंत्री राजेश टोपेंचा ईशारा

    जालना : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत  काही खासगी हॉस्पीटल मध्ये रुग्णांची बीलं मोठ्या प्रमाणात आकारण्यात येत आहेत. आणि डिपॉझिटही घेण्यात येत आहे. त्यामुळे अरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अशा रुग्णालयांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

    म्हणाले की, राज्यातील अनेक खाजगी दवाखाने कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी ५० हजार रुपये डिपॉझिट मागत असून हा अक्षम्य आणि क्षमा योग्य गुन्हा नसून तातडीने प्रशासनामार्फत अशा, रुग्णालयांवर कारवाई करण्यात येईल, असा ईशारा टोपे यांनी दिला आहे.

    मार्ड डॉक्टरांच्या मागण्यांविषयी अरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रीया ?

    मार्ड हा विषय वैद्यकीय शिक्षण खात्याशी संदर्भात असून मार्डला आम्ही नेहमीच सहानुभूतीने त्यांचा विचार केला.मार्डच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री पुर्णपणे विचार करतील.आणि निंर्णय घेतील मात्र हा संप करण्याचा वेळ नाही.जिथे महामारी आहे तिथे संपाचा विचार करणे बरोबर नाही.मार्डची सेवा महत्वाची असून त्यांनी या वेळेचे भान ठेवावे असंही टोपे यांनी म्हटलं आहे.