हवेतून ऑक्सिजन शोषून घेण्याचे प्लांट राज्यातील सर्व जिल्ह्यात बसवण्याचा निर्णय; राजेश टोपे यांची माहिती

    जालना : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. तसेच राज्यात इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्णाण झाला आहे. यावरुन आता ऑक्सिजन, ऑक्सिजन सिलेंडर, हवेतून ऑक्सिजन शोषून घेणारे प्लांट उभे करण्यासाठी मदत, रेमडेसिविरचा साठा वाढून मिळावा अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली ते जालन्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

    केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरस बैठक झाली. , त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दररोज 500 टन ऑक्सिजनची राज्याला गरज असून ज्या राज्यातून हे ऑक्सिजन राज्याला मिळेल. त्या राज्यांनी बाधा आणू नये अशीही मागणी केल्याचे टोपे यांनी सांगितले आहे.

    तसेचं हवेतून ऑक्सिजन शोषून घेण्याचे प्लांट जिल्ह्या-जिल्ह्यात बसववण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं देखील ते म्हणाले. रेल्वेच्या माध्यमातून देखील ऑक्सिजन आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे टोपे यांनी सांगितलं आहे. दरम्यान देशात कोरोनामुळे 797 डॉक्टरांचा मृत्यू झाला असून याच घटकामुळे कोरोना काळात खूप मदत झाली.

    ज्या डॉक्टरांचा मृत्यू झाला त्यांना आपण केंद्र सरकारच्या माध्यमातून मदत केली आहे.ज्या डॉक्टरांचा मृत्यू झाला त्यांना मि श्रद्धांजली अर्पण करतो असेही ते म्हणाले. दरम्यान राज्यात ब्रेक द चैनचा निंर्णय उदात्त हेतून घेतला असून लोकांनी त्याचे पालन करावे मात्र 15 दिवस संपल्यांनंतर जी परिस्थिती राहील त्यानंतर निर्बध वाढवायचे की नाही यावर निर्णय घेऊ असंही ते म्हणाले.