jalna flood

जालना(Jalna) जिल्ह्यात गल्हाटी नदी शेजारच्या पिठोरी सिरसगाव,करंजाळा, जालूरा,घुंगर्डे हादगाव आदी गावात नदीचे पाणी शिरले आहे. यामुळे ग्रामस्थांचा जागता पहारा आहे. शेतकऱ्यांच्या शेतीला सध्या तलावाचे रुप आले आहे.

    जालना : जालना(Jalna) जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाची संततधार(Heavy Rain In Jalna) सुरू आहे. यामुळे नदी-नाले, धरण तुडुंब भरून वाहत आहेत. अंबड तालुक्यातील डावरगाव,सुखापुरी लघु प्रकल्प व बारसवाडा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने गल्हाटी नदी धोक्याची पातळी ओलांडू वाहत आहे.

    गल्हाटी नदी शेजारच्या पिठोरी सिरसगाव,करंजाळा, जालूरा,घुंगर्डे हादगाव आदी गावात नदीचे पाणी शिरले आहे. यामुळे ग्रामस्थांचा जागता पहारा आहे. शेतकऱ्यांच्या शेतीला सध्या तलावाचे रुप आले आहे. शेतकऱ्यांची सोयाबीन, ऊस, मोसंबीची, पिके संपूर्ण पुराच्या पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. नुकसानीचे जिल्हा प्रशासनाने तातडीने सॅटेलाइटच्या माध्यमातून पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.