जालन्यात कार विहिरीत कोसळून चार जण बुडल्याची भीती, युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू

जालना ते देऊळगाव राजा रोडवर जामवाडी शिवारातील विहिरीत कोसळल्याने कारमधील चार ते पाच जण पाण्यात बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही घटना आज शुक्रवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली. क्रेनच्या सहाय्याने कारला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.

    जालन्याहून बुलढाण्याकडे जाणारी कार जालना ते देऊळगाव राजा रोडवर जामवाडी शिवारातील विहिरीत कोसळल्याने कारमधील चार ते पाच जण पाण्यात बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही घटना आज शुक्रवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली. क्रेनच्या सहाय्याने कारला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली. दरम्यान, कारमधील एकाला बाहेर काढून रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

    अंधार आणि विहिर तुडूंब भरलेली असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहे. सदर कार जालन्याहून बुलढाण्याकडे जाताना हा अपघात झाल्याचे समजते. ही विहीर तुडुंब भरलेली असल्यामुळे विहिरीतून कार बाहेर काढण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. कारमध्ये प्रत्यक्ष किती लोक आहेत हे समजू शकले नाही. मात्र चार ते पाच जण असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी युद्धपातळीवर मदत कार्य करीत आहेत.