महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी भरारी पथकं नेण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आदेश

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत ( Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana)  अनेक रुग्णांची रुग्णालयांकडून लुबाडणूक होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही लूट (Loot) थांबवण्यासाठी राज्य सरकारकडून (Central  Government) एक परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.

जालना : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत ( Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana)  अनेक रुग्णांची रुग्णालयांकडून लुबाडणूक होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही लूट (Loot) थांबवण्यासाठी राज्य सरकारकडून (Central  Government) एक परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. यामध्ये योजनेचा पूर्ण अभ्यास करून रुग्णालयांच्या तपासणीसाठी भरारी पथकांची नेमणूक करावी असा आदेश राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे.

जालन्यात (Jalna) आज शनिवारी राजेश टोपे यांच्या हस्ते कोरोना हॉस्पिटलमध्ये (Corona Hospital)  ४० बेडच्या अतिदक्षता विभागाचं उद्घाटन (Inauguration) करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २०० खाटांच्यावर (Beds)असणाऱ्या प्रत्येक रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजनचा प्लॅन्ट (Plant of liquid oxygen) उभारण्यासाठी प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाला आदेश देण्यात आले असल्याची, माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

जुन्या ऑक्सिजन सिलेंडरवर आता निर्भर राहून चालणार नाही. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधील निधी वापरा किंवा आरोग्य विभागाकडून निधी दिला जाईल, असे राजेश टोपे म्हणाले.