कुणी ओबीसी समाजात घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर… विजय वडेट्टीवार यांचा इशारा

आपल्यातील काही समाज थोडे पुढे गेले असतील पण भटका समाज अजूनही खूप मागे आहे. १२ बलुतेदारांची अवस्था वाईट आहे, मी विश्वासाने सांगतो बारा बलुतेदारांचे स्वतंत्र महामंडळ निर्माण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही त्याबाबतची कारवाई सुरू केली असल्याचे ओबीसी विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. जालना येथील ओबीसी मोर्चात ते बोलत होते.

जालना : आपल्यातील काही समाज थोडे पुढे गेले असतील पण भटका समाज अजूनही खूप मागे आहे. १२ बलुतेदारांची अवस्था वाईट आहे, मी विश्वासाने सांगतो बारा बलुतेदारांचे स्वतंत्र महामंडळ निर्माण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही त्याबाबतची कारवाई सुरू केली असल्याचे ओबीसी विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. जालना येथील ओबीसी मोर्चात ते बोलत होते.

ओबीसी समाजात कुणी घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही पहारेकरी उभे आहोत. ओबीसी समाजात घुसू पाहणाऱ्यांना हा इशारा आहे. गायकवाड समिती ही मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणाची ही समिती होती मात्र या समितीवर मागासवर्गीयच नव्हते हाच खरा मुद्दा आहे तरी देखील एसीबीसी तून मराठा समाजाला आरक्षण घेण्यासाठी कुणाचाही विरोध नाही, परंतु काही विघ्नसंतोषी त्याला वेगळे वळण देण्यासाठी काम करत आहेत, असे ते यावेळी बोलताना म्हणाले.

ओबीसी समाजाचा कार्यकर्ता म्हणून आपण मोर्चात सहभागी होत आहोत आणि मंत्री म्हणून व्यथा ऐकणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. केंद्र सरकारने ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करावी असे ते म्हणाले.