काही अडचण आली तर राज्य सरकार सक्षम : आरोग्यमंत्री राजेश टोपे

जालना (Jalna) येथील जिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यास शनिवारी सुरुवात झाली. मार्च २०२० पासून आजतागायत कोरोनामुळे सर्वसामान्यांचे हाल झाले. या काळात आरोग्य विभागासह इतर विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी केलेल्या कामामुळे कोरोना नियंत्रणात राहिला. दुसऱ्या टप्प्यात स्वच्छता कर्मचारी, ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जाणार आहे.

जालना : राज्यात लसीकरणास प्रारंभ झाला असून कोरोना लसीकरणाचा (Corona Vaccine)  आज ऐतिहासिक क्षण आहे. लसीकरणातील शेवटच्या लाभार्थ्यांना मोफत लस मिळावी यासाठी केंद्र शासनाकडे (Central Government) पाठपुरावा करीत आहोत. दारिद्र्य रेषेखालील गरजूंना मोफत लस मिळावी अशी इच्छा असून यात काही अडचण आली तर राज्य सरकार यासाठी सक्षम असल्याची ग्वाही आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली.

जालना (Jalna) येथील जिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यास शनिवारी सुरुवात झाली. मार्च २०२० पासून आजतागायत कोरोनामुळे सर्वसामान्यांचे हाल झाले. या काळात आरोग्य विभागासह इतर विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी केलेल्या कामामुळे कोरोना नियंत्रणात राहिला. दुसऱ्या टप्प्यात स्वच्छता कर्मचारी, ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात राज्यासाठी १७.५० लाख डोस आवश्यक आहेत. आजवर ९.८० लाख डोस प्राप्त झाले आहेत. उर्वरित डोस लवकर उपलब्ध होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विशेषतः दारिद्रय रेषेखालील सर्वाना मोफत लस मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे टोपे यांनी सांगितले.