jalna farmer commit suicided in rajesh tope meeting

सावकाराने जमीन हडपली असून यासंदर्भात वारंवार तक्रारी करून देखील महसूल आणि पोलीस प्रशासन काहीच कारवाई करत नसल्याने संतप्त झालेल्या या शेतकऱ्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयात राजेश टोपे यांच्या उपस्थितीत होत असलेल्या आढावा बैठकीदरम्यान विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक प्रकारामुळे उपस्थितांमध्ये एकाच खळबळ उडाली.

जालना.  आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीदरम्यान एका शेतकऱ्याने विष (farmer commit suicide) घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने एकाच खळबळ उडाली आहे. विलास राठोड असे  या शेतकऱ्याचा नाव असून तो सेवली शिवारातील पाथरूड गावाचा रहिवासी आहे.

सावकाराने जमीन हडपली असून यासंदर्भात वारंवार तक्रारी करून देखील महसूल आणि पोलीस प्रशासन काहीच कारवाई करत नसल्याने संतप्त झालेल्या या शेतकऱ्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयात राजेश टोपे यांच्या उपस्थितीत होत असलेल्या आढावा बैठकीदरम्यान विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक प्रकारामुळे उपस्थितांमध्ये एकाच खळबळ उडाली.

घटनेनंतर लगेचच सदर शेतकऱ्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. आधीच विरोधांकडून शेतकऱ्यांच्या समस्यांवर सरकारला घेरले जात असताना या घटनेमुळे पालकमंत्री राजेश टोपे यांच्यासमोर अडचण निर्माण झाली आहे.