
जालना : अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर ( Urmila Matondkar )यांचा शिवसेना (Shivsena) प्रवेश निश्चित झाला आहे. भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे (pritam munde) यांनी ऊर्मिला मातोंडकर यांना शुभेच्छा देताना शिवसेनेला टोला लगावला आहे.
‘ऊर्मिला मातोंडकर या शिवसेनेत प्रवेश करणार आहे, असं ऐकलं आहे. मातोंडकर यांना माझ्या शुभेच्छा आहेत असं प्रीतम मुंडे म्हणाल्या. उर्मिला यांनी अगोदर काँग्रेसकडून नशीब आजमावलं त्यात त्यांना अपयश आलं होतं. आता बघू त्यांचं नशीब बदलते की शिवसेनेचं नशीब बदलते’, असा म्हणत प्रीतम मुंडे यांनी शिवसेनेला चिमटा काढला आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर उर्मिला मातोंडकर निवडणुक रिंगणात उतरल्या. यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला. त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेनं उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस राज्यपालांकडे केली. त्यावेळीच उर्मिला मातोंडकर या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती. अखेर मंगळवारी यावर शिक्कामोर्तब होणार असून उर्मिला मातोंड़कर यांचा शिवसेनेत औपचारिक प्रवेश होणार आहे.