जालन्यात ओबीसींचा भव्य मोर्चा, करणार ही प्रमुख मागणी

सरकारनं ओबीसी समाजाची जनगणना करावी. केंद्रीय अर्थसंकल्पात ओबीसी समाजासाठी विविध आर्थिक तरतुदी करण्यासाठी याचा उपयोग होईल, अशी मागणी ओबीसी समाजानं केलीय. ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अशी मागणीदेखील करण्यात आलीय. त्याचसोबत ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये आणि नॉन क्रिमी लेअरची अट रद्द करावी यासह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा निघणार आहे.

ओबीसी समाजाची जनगणना करावी या प्रमुख मागणीसाठी आज (रविवारी) जालन्यामध्ये भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. या मोर्चात सर्व ओबीसींनी अधिकाधिक संख्येनं उपस्थित राहावं, असं आवाहन मोर्चाच्या आयोजकांनी केलंय. शनिवारी अधिकाधिक जणांपर्यंत मोर्चाच्या आयोजनाची बातमी पोहोचवण्यासाठी बाईक रॅलीचंही आयोजन करण्यात आलं होतं.

सरकारनं ओबीसी समाजाची जनगणना करावी. केंद्रीय अर्थसंकल्पात ओबीसी समाजासाठी विविध आर्थिक तरतुदी करण्यासाठी याचा उपयोग होईल, अशी मागणी ओबीसी समाजानं केलीय. ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अशी मागणीदेखील करण्यात आलीय. त्याचसोबत ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये आणि नॉन क्रिमी लेअरची अट रद्द करावी यासह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा निघणार आहे.

या मोर्चात पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, वनमंत्री संजय राठोड, माजी मंत्री पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, हंसराज अहिर, महादेव जानकर, समीर भुजबळ आणि विकास महात्मे हे राज्यातील ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत. विविध ठिकाणाचे ओबीसी नेते आणि समाजबांधव या मोर्चात सहभागी होतील, असा विश्वास मोर्चाच्या आयोजकांनी व्यक्त केलाय.

सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी  महाराज पुतळा परिसरातून हा मोर्चा सुरू होईल आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विसर्जित करण्यात येणार आहे.सरकारच्या वतीनं मंत्री विजय वडेट्टीवार हे मागण्यांचं निवेदन स्विकारणार आहेत.