जालना जिल्ह्यात पुन्हा पावसाची हजेरी, मांदळा लघु प्रकल्प ओव्हरफ्लो

जालना जिल्ह्यात आज सकाळी पावसानं पुन्हा हजेरी लावली आहे. भोकरदन, जाफ्राबाद या तालुक्यासह घनसावंगी तालुक्यात पाऊस झाला. गेल्या 4 दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे घनसावंगी तालुक्यातील मांदळा लघु प्रकल्प ओव्हरफुल झाला आहे.

    जालना : जालना जिल्ह्यात आज सकाळी पावसानं पुन्हा हजेरी लावली आहे. भोकरदन, जाफ्राबाद या तालुक्यासह घनसावंगी तालुक्यात पाऊस झाला. गेल्या 4 दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे घनसावंगी तालुक्यातील मांदळा लघु प्रकल्प ओव्हरफुल झाला आहे.

    दरम्यान यामुळे प्रकल्प क्षेत्रांत येणाऱ्या गावांचा पाणी प्रश्न सुटला आहे. भोकरदन तालुक्यातील जुई मध्यम प्रकल्पात देखील पाण्याची आवक वाढल्यानं हा प्रकल्प भरण्याच्या स्थितीत आहे.