ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका नाही तर… जाहीर सभेत विजय वडेट्टीवार यांचा इशारा

ओबीसी समाजाची जनगणना करावी या प्रमुख मागणीसाठी आज (रविवारी) जालन्यामध्ये भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आले.  ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका, असा इशाराच राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री तसेच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार जालन्यातील जाहीर सभेत दिला आहे. आरक्षणासाठी संघर्षाची लढाई करताना कशाचीही पर्वा नाही, असा निर्धारही वडेट्टीवार यांनी यावेळी बोलून दाखवला.

जालाना : ओबीसी समाजाची जनगणना करावी या प्रमुख मागणीसाठी आज (रविवारी) जालन्यामध्ये भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आले.  ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका, असा इशाराच राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री तसेच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार जालन्यातील जाहीर सभेत दिला आहे. आरक्षणासाठी संघर्षाची लढाई करताना कशाचीही पर्वा नाही, असा निर्धारही वडेट्टीवार यांनी यावेळी बोलून दाखवला.

ओबीसींच्या जनगणनेचा मार्ग मोकळा करा आणि आम्हाला न्याय द्या, असे आवाहन वडेट्टीवारांनी केंद्राला केले. मुख्यमंत्र्यांकडे ओबीसींच्या जनगणनेची मागणी केली. वेळ पडल्यास विधानसभेत जनगणनेचा प्रस्ताव आणण्याची मागणी करू, असेही वडेट्टीवार म्हणाले.

सरकारनं ओबीसी समाजाची जनगणना करावी. केंद्रीय अर्थसंकल्पात ओबीसी समाजासाठी विविध आर्थिक तरतुदी करण्यासाठी याचा उपयोग होईल, अशी मागणी ओबीसी समाजानं केलीय. ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अशी मागणीदेखील करण्यात आलीय. त्याचसोबत ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये आणि नॉन क्रिमी लेअरची अट रद्द करावी यासह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय.