भाजप नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर
भाजप नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर

भाजप नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी आयपीएस अधिकाऱ्यांना अलीकडेच फोन करून न्यायालयाच्या आदेशाशिवाय पोलीस व्यापाऱ्यांच्या घरात घुसतातच कसे? असा प्रश्न विचारला आहे. वाद एवढ्यावरच थांबला नाही तर लोणीकरांनी चक्क आयपीएस अधिकाऱ्यांना विधानसभेत उलटे टांगण्याची धमकी दिली. याबाबतचा एक कथित ऑडिओ अलीकडेच सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे.

  • माजी मंत्री बबनराव लोणीकरांवर पोलीस अधिकाऱ्याला धमकविल्याचा आरोप

जालना (Jalna).  भाजप नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी आयपीएस अधिकाऱ्यांना अलीकडेच फोन करून न्यायालयाच्या आदेशाशिवाय पोलीस व्यापाऱ्यांच्या घरात घुसतातच कसे? असा प्रश्न विचारला आहे. वाद एवढ्यावरच थांबला नाही तर लोणीकरांनी चक्क आयपीएस अधिकाऱ्यांना विधानसभेत उलटे टांगण्याची धमकी दिली. याबाबतचा एक कथित ऑडिओ अलीकडेच सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे.

क्लिपमध्ये बबनराव लोणीकर परतूरचे एपीआय रविंद्र ठाकरे यांच्याशी फोनवर बोलत असल्याचे जाणवत आहे. प्रकरण असे की, आयपीएस अधिकारी हसन गौहर यांना तीन दिवसांपूर्वी परतूरमधील एका व्यापाऱ्याच्या घरी मोठ्या प्रमाणावर गुटखा असल्याची टीप मिळाल्यानंतर पथकासह त्या व्यापाऱ्याच्या घरावर छापा टाकला होता; पण त्यांना छापेमारीत काहीच आढळून आले नाही. यानंतर संबंधित व्यापाऱ्याने घडलेला प्रसंग लोणीकर यांना सांगितला. यामुळे लोणीकर संतापले आणि त्यांनी थेट पोलिस अधिकाऱ्यांना फोन करून धमकावल्याचे सांगण्यात येत आहे. या ऑडिओमुळे भाजप पक्षाची चांगलीच गोची झालेली जाणवत असल्याचे बोलले जात आहे.