Swabhimani Shetkari Sanghatana's young district president Nivruti Shewale planted poppy in the field

निवृत्ती शेवाळे असे अटक केलेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. शेवाळे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा युवा जिल्हाध्यक्ष आहे. एका बड्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्याने केल्या या गैर कृत्यामुळे जालना जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

    जालना : स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्याने शेतात अफूची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या पदाधिकाऱ्याला अटक करत २४ लाखांची अफूची झाडे जप्त केली आहेत.

    निवृत्ती शेवाळे असे अटक केलेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. शेवाळे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा युवा जिल्हाध्यक्ष आहे. एका बड्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्याने केल्या या गैर कृत्यामुळे जालना जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

    शेवाळे याने आपल्या शेतातच अफूची लागवड केली होती. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील चणेगाव येथे शेवाळे याच्या गट क्रमांक ९१ मध्ये रात्री पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात ९६ किलो २०० ग्राम वजनाचा अफू जप्त करण्यात आलाय. तसेच २४ लाखांची अफूची झाडे जप्त करण्यात आली आहेत.