जालन्यात कोरोना रूग्णांची संख्या चिंताजनक?

जालना शहरातील कोरोना रूग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. तसेच कोरोना रूग्णांची संख्या वाढल्यामुळे, जालन्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. जालना शहरातील आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तर शुक्रवार रूग्णालयात उपाचार घेत असणाऱ्या दोन कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तसचे काही जणांचे अहवाल तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले होते. त्यातील आठ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तर सहा जणांचा अहवाल निगेटिव्ह आला होता.

दरम्यान जालना शहरातील कोरोना बाधितांची संख्या पाहिली असता, ८६० च्या वर गेली आहे. तर आतापर्यंत ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ५१५ जणांनी कोरोनावर मात केली असल्याचे समजले जात आहे.