परतूर तालुक्यात तिघांना जलसमाधी; बामनी-वालखेड जवळील घटना

आसाराम खालापुरे यांचा पाण्यात जाताच पाय घसरला. तिघेही पाण्यात  पडले आणि वाहून गेले. दोन जणांना वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले.

    जालना,  परतूर (Partur) तालुक्यातील बामनी-वालखेड  पुलावर पाणी आलेले असताना रस्ता ओलांडणे जीवावर बेतले आहे. या घटनेत तीन जण पाण्यात बुडाले, दोन जणांना वाचवण्यात यश आले तर  तर एक अद्यापही बेपत्ता आहे.

    गावाचे उपसरपंच राजेंद्र खालापुरे, वय 35, आसाराम खालापुरे, वय 55, ग्रामपंचायत सदस्याचे पती आणि वालखेडचे 32 वर्षीय लखन कांबळे हे रात्री परतूरहून बामनी गावाकडे मोटारसायकलने जात  होते. दरम्यान दिवसभर संततधार पावसामुळे बामनी गावाजवळील पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता बंद झाला. रात्री पुलावरून पाणी वाहत असल्याने तिघांनी एक मेकाला धरून पूल ओलांडण्याचा निर्णय घेतला.

    आसाराम खालापुरे यांचा पाण्यात जाताच पाय घसरला. तिघेही पाण्यात  पडले आणि वाहून गेले. दोन जणांना वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले. बेपत्ता झालेले आसाराम खालापुरे यांचे रात्री पुलावरून व नदीमध्ये उशिरापर्यंत शोध घेण्याची प्रक्रिया सुरूच होती.