जालन्यातील तीन भावांचा शॉक लागून मृत्यू – नातेवाईकांचा महावितरण कंपनीवर रोष

जालन्यातील (jalna) पळसखेडा पिंपळे या गावातील ३ सख्ख्या भावंडांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

जालना : जालन्यातील (jalna) पळसखेडा पिंपळे या गावातील ३ सख्ख्या भावंडांचा विहिरीत पडून मृत्यू(death after falling in well) झाला आहे. आज भल्या पहाटे ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. विजेचा शॉक लागून या तिन्हीही सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

ज्ञानेश्वर जाधव, रामेश्वर जाधव  आणि सुनील जाधव  अशी मृतांची नावे आहेत. जालन्यातील पिंपळगाव पिंपळे गावातील या तिन्हीही सख्ख्या भावंडांचा गुरवारी पहाटे विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. या घटनेमुळे जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हे तिन्हीही भाऊ रात्रपाळीची वीज असल्याने शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. पण तिघांचेही मृतदेह विहीरीतील पाण्यात आढळून आले.

मृत भावांपैकी सर्वात मोठा असलेला ज्ञानेश्वर हा शेती करायचा. दुसरा रामेश्वर हा औरंगाबादमध्ये शिक्षण घेत होता. तर सर्वात लहान भाऊ सुनील हा बारावीत शिकत होता. या घटनेनंतर मृत भावंडांच्या नातेवाईकांनी महावितरण कंपनीवर ठपका ठेवला आहे. महावितरण कंपनीने रात्र पाळीची लाईन न देता दिवसभरात ६ तास जरी वीज दिली तर ही वाईट वेळ शेतकऱ्यांवर येणार नाही असे सांगत या तिघा भावंडांच्या मृत्यूबाबत घातपाताची शक्यताही व्यक्त केली. या भावंडांच्या मृत्यूची चौकशी करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली. महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना दिवसा वीज वाटप करण्याचे नियोजन केले असते तर आज हे तिघेही भावंडे जिवंत असते असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.