मध्य रेल्वे मंडळाच्या प्रबंधक कार्यालयात सद्भावना दिवस साजरा

मध्य रेल्वे मंडळाच्या भुसावळ कार्यालयात आज सद्भावना दिवस साजरा करण्यात आला . यावेळी रेल्वे प्रबंधक  विवेक कुमार गुप्ता यांनी सर्व कर्मचाऱ्यांना आणि उपस्थितांना  एकत्रितपणे राष्ट्रीय एकात्मतेला  प्रोत्साहन देण्यासाठी  सकाळी  अकरा वाजता शपथ दिली. यावेळी सर्वानी सामाजिक अंतर व मास्क लावून हि शपथ घेतली. 

या कार्यक्रमात अप्पर मंडळ रेल प्रबंधक मनोज कुमार सिन्हा , वरिष्ठ कार्मिक अधिकारी एन डी गांगुर्डे ,वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक  युवराज पाटील , वरिष्ठ मंडळ इंजिनियर ( समन्वय ) राजेश चिखले , वरिष्ठ मंडळ यांत्रिक अभियंता  लक्ष्मी नारायण आणि सर्व शाखांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते .