चोपड्याच्या शिवसेना आमदार लता सोनवणे यांची आमदारकी धोक्यात, जातीचे प्रमाणपत्र रद्द, राजकीय क्षेत्रात खळबळ

2019 मध्ये चोपडा विधानसभा मतदार संघात, अनुसूचित जमातीच्या राखीव जागेसाठी लताताई चंद्रकांत सोनवणे(शिवसेना), जगदीशचंद्र रमेश वळवी (राष्ट्रवादी), प्रभाकर गोटू सोनवणे, (भाजप बंडखोर) आणि माधुरी किशोर पाटील (अपक्ष) यांच्यात लढत झाली होती. या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार लताताई सोनवणे या निवडून आल्या होत्या. दुसऱ्या क्रमांकाची मते राष्ट्रवादीचे जगदीशचंद्र रमेश वळवी यांना मिळाली होती. निवडणुकीनंतर जगदीशचंद्र वळवी यांनी आमदार सोनवणे यांच्या टोकर-कोळी जात प्रमाणपत्राला औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

चोपडा, जळगाव –  चोपड्याच्या शिवसेनेच्या आमदार लता सोनवणे ( Shivsena MLA Lata Sonavane) यांची आमदारकी धोक्यात आली आहे. अनुसूचित जमातीच्या राखीव जागेसाठी लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी 2019 मधे विधानसभा निवडणूक (2019 assembly election) शिवसेनेकडून लढवली होती. यावेळी लताताई आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. निवडणुकीनंतर पराभूत उमेदवार तथा माजी आमदार जगदीशचंद्र वळवी यांनी आमदार सोनवणे यांच्या जात प्रमाणपत्राला औरंगाबाद  उच्च न्यायालयात (Aurangabad high court) आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशाने जात पडताळणी समिती नंदूरबार कार्यालयाने या खटल्याचा निकाल ४ नोव्हेंबरला दिला असून, समितीने आमदार लताताई सोनवणे यांचे नामांकन  पत्रासोबत जोडलेले टोकरे-कोळी जातीचे प्रमाणपत्र रद्दबात्तल ठरवले आहे. या निकालामुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 2019 मध्ये चोपडा विधानसभा मतदार संघात, अनुसूचित जमातीच्या राखीव जागेसाठी लताताई चंद्रकांत सोनवणे(शिवसेना), जगदीशचंद्र रमेश वळवी (राष्ट्रवादी), प्रभाकर गोटू सोनवणे, (भाजप बंडखोर) आणि माधुरी किशोर पाटील (अपक्ष) यांच्यात लढत झाली होती. या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार लताताई सोनवणे या निवडून आल्या होत्या. दुसऱ्या क्रमांकाची मते राष्ट्रवादीचे जगदीशचंद्र रमेश वळवी यांना मिळाली होती. निवडणुकीनंतर जगदीशचंद्र वळवी यांनी आमदार सोनवणे यांच्या टोकर-कोळी जात प्रमाणपत्राला औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सदर खटल्याची सुनावणी होऊन उच्च न्यायालयाच्या आदेशाने जात पडताळणी समितीला याची पुन्हा पडताळणी करण्याचे आदेश दिले होते. आता या निर्णयानंतर आमदार लता सोनवणे पुन्हा याबाबत पुन्हा अपिलात जाणार आहेत,  अशी माहिती त्यांच्या नीकटवर्तीयांनी दिली. या बाबत आमदार सोनवणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही.