Shirpur Municipality Construction Committee Chairman Tapanbhai Patel died in an accident
शिरपूर नगरपालिकेचे बांधकाम समिती सभापती तपनभाई पटेल अपघातात ठार

अपघातात गाडीचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर होऊन गाडीचे दोन्ही चाक निखळले गेले आहेत. तपनभाई हे माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांचे पुतणे होते. त्यांचा अंत्यविधी आज संध्याकाळी ५ वाजता आर.सी. पटेल फार्मसी कॉलेज प्रांगणात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून केला जाणार आहे.

धुळे (Dhule) : शिरपूर बालाजी नगरीचे (shirpur balaji nagri) उद्योगपती तथा नगरपालिकेचे (nagarpalika) बांधकाम समिती सभापती (Construction Committee Chairman) तपनभाई मुकेशभाई पटेल (Tapanbhai Mukeshbhai Patel) हे सावळदे निम्स कॅम्पसमधून (Savalde Nimes Campus) घराकडे येत असताना महामार्गावरील शिरपूर टोल नाक्याजवळ (shirpur toll naka) दुभाजकाला ठोकल्या गेल्यामुळे जागीच मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे .

या अपघातात गाडीचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर होऊन गाडीचे दोन्ही चाक निखळले गेले आहेत. तपनभाई हे माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांचे पुतणे होते. त्यांचा अंत्यविधी आज संध्याकाळी ५ वाजता आर.सी. पटेल फार्मसी कॉलेज प्रांगणात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून केला जाणार आहे.

हा अपघात बुधवारी (३० सप्टेंबर) पहाटे १ वाजेच्या सुमारास महामार्गावरील शिरपूर फाट्यानजिक असलेला टोलनाक्यासमोरील हॉटेल गॅलेक्झीसमोर झाला. उद्योगपती तपनभाई पटेल हे त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्याला सोडविण्यासाठी महामार्गावरील सावळदे येथील मुकेशभाई पटेल कॅम्पसमध्ये गेले होते. पाहुण्याला सोडल्यानंतर भरधाव वेगाने परत येत असताना महामार्गावरील हॉटेल गॅलेक्झीसमोर दुभाजकाला ठोकल्यामुळे गाडीचा पुढील भाग चक्काचूर झाला.

घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने येथील नगरपालिकेच्या इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलला आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

शिवसेनेचे माजी खासदार स्व़।मुकेशभाई पटेल यांचा तो मुलगा होता. माजी मंत्री अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांचा तो पुतण्या होता.