किसान पार्सल रेल्वेच्या फेर्‍यांत मागणीनुसार वाढ.. जाणून घ्या गाड़ीच्या वेळा

शेतकर्‍यांसाठी किसान देवळाली ते दानापूर दरम्यान किसान रेल्वे 7 ऑगस्टपासून सुरु झाली आहे. भारतातील ही पहिली किसान पार्सल गाड़ी आहे. आठवड्यातून एकदा ती धावत होती मात्र शेतकर्‍यांनी मागणी केल्याने या गाड़ीच्या फेरीमध्ये वाढ केली असून ही सेवा 25 सप्टेंबर पर्यंत सुरु राहणार आहे, असे रेल्वेने कळविले आहे.

वेळापत्रकात बदल 

किसान पार्सल रेल्वे गाड़ीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे .यामुळे आता शेतकरी , व्यापारी , बाजार समिती , लोडर्स यांना आपल्या सोयीनुसार जास्तीत जास्त प्रमाणात माल पाठविता येईल . गाड़ीच्या वेळेमध्ये पुढीलप्रमाणे बदल करण्यात आला आहे. 

* गाड़ी क्रमांक – 00107 डाउन देवळाली –ते  मुजफ्फरपुर किसान पार्सल गाड़ी ही दर शुक्रवार देवळाली स्टेशनहुन 18.00 वाजता प्रस्थान करुन  रविवारी  सकाळी 03.55 वाजता मुजफ्फरपुर स्टेशनला पोहचेल . 

थांबा  — नाशिक रोड 18.10/18.30, मनमाड-19.30/19.55, जळगाव-21.55/22.15, भुसावळ-22.45/23.15, शनिवारी  बरहानपुर – 00.05/00.20, खंडवा -02.10/02.25 , इटारसी, पिपरिया, गाडरवारा, नरसिंगपुर,जबलपूर, कटनी, सतना,  माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं.दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि दानापुर याठिकाणी थांबे देण्यात आले आहेत.

* गाडी क्रमांक 00108 अप मुजफ्फरपुर ते देवळाली ही गाडी प्रत्येक रविवारी 08.00  वाजता प्रस्थान करून सोमवारी 17.45 वाजता देवळाली ला पोहोचल.

थांबा – सोमवारी खंडवा – 09.55/10.15 , बुऱ्हाणपूर – 11.35/11.55 , भुसावळ – 12.50/13.10 , जळगांव – 13.40/13.50, मनमाड – 15.50/16.10 , नासिक – 17.15/17.35

शेतकर्‍यांना माल पॅक करून जवळ रेल्वे पार्सल ऑफिसमध्ये आधार कार्डच्या झेरॉक्ससह आणावा लागेल.  शेतकरी ,कार्गो एग्री ग्रेटर , व्यापारी ,बाजार समिती , आणि लोडर्स, याना आपल्या जवळपासच्या स्टेशन मुख्य पार्सल पर्यवेक्षक यांच्याकड़े संपर्क करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनने केले आहे