maharashtra ats isi agent arrested in nashik
नाशकात आयएसआय (ISI) एजंटला अटक, महाराष्ट्र एटीएसची (ATS) कारवाई

पाकिस्तानमधील (Pakistan) ‘आयएसआय’ (isi) या गुप्तहेर संघटनेला हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) कारखाना व तेथे बनविण्यात येणाऱ्या लढाऊ विमानांसंबंधित (fighter planes) संवेदनशील माहिती ओझर (ozer) येथील एचएएलचा (HAL) दीपक शिरसाठ (Deepak Shirsat) हा कर्मचारी पुरवत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

पाकिस्तानमधील (Pakistan) ‘आयएसआय’ (isi) या गुप्तहेर संघटनेला हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) कारखाना व तेथे बनविण्यात येणाऱ्या लढाऊ विमानांसंबंधित (fighter planes) संवेदनशील माहिती ओझर (ozer) येथील एचएएलचा (HAL) दीपक शिरसाठ (Deepak Shirsat) हा कर्मचारी पुरवत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) त्याला अटक केली असून न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच देवळाली येथील तोफखाना केंद्र परिसरात हेरगिरी करणाऱ्या बिहारी तरुणाला लष्करी अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले होते. एकापाठोपाठ एक अशा दोन घटना उघड झाल्याने पोलीस आणि लष्करी यंत्रणा कमालीची सतर्क झाली आहे. भारतीय बनावटीची विमाने, त्यांचा संवेदनशील तांत्रिक तपशील, त्याचबरोबर एचएएल कारखाना, तेथील प्रतिबंधित क्षेत्रांची गोपनीय माहिती शिरसाट आयएसआयला पुरवत होता.

तीन मोबाईल, पाच सिमकार्ड जप्त

एटीएसच्या पथकाने दीपक शिरसाठ याच्याकडील तीन मोबाईल हॅण्डसेट, पाच सिमकार्ड आणि दोन मेमरी कार्ड जप्त केले आहेत. हे साहित्य अधिक विश्लेषण करण्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे.