Onion Price Downfall in lasalgaon auction will closed
कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी; सरकारच्या जाचक अटींमुळे दरात घसरण, लिलाव बंद पाडले

केंद्र सरकारने (central government) कांदा व्यापाऱ्यांच्या (onion sellors) साठवणुकीवर (stock) मर्यादा (limit) घातल्याने लासलगाव बाजार समितीत (Lasalgaon Bazar Samiti) शुक्रवारच्या तुलनेत आज शनिवारी अकराशे रुपयांची प्रति क्विंटलमागे मोठी घसरण (downfall) झाल्याने महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक होत कांद्याचे लिलाव बंद (auction closed) पडत कांद्यावरील सर्व निर्बंध मागे घ्या, अन्यथा यापेक्षाही मोठे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक भारत दिघोळे (Bharat Dighole) यांनी दिला आहे.

लासलगाव : केंद्र सरकारने कांदा व्यापाऱ्यांच्या साठवणुकीवर मर्यादा घातल्याने लासलगाव बाजार समितीत शुक्रवारच्या तुलनेत आज शनिवारी अकराशे रुपयांची प्रति क्विंटलमागे मोठी घसरण झाल्याने महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक होत कांद्याचे लिलाव बंद पडत कांद्यावरील सर्व निर्बंध मागे घ्या, अन्यथा यापेक्षाही मोठे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक भारत दिघोळे यांनी दिला आहे.

राज्यातील लासलगावसह प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याचे नवनवीन विक्रम होत असल्याने कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या निर्यातबंदी, व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाचे छापे तसेच विदेशातून कांदा आयात केला. पण कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात येत नसल्याने केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने व्यापाऱ्यांकडील कांदा साठवणुकीवर मर्यादा घालत घाऊक व्यापाऱ्यांना २५ टनांपर्यंत तर किरकोळ व्यापाऱ्यांना २ टनापर्यंत ३१ डिसेंबरपर्यंत नोटिफिकेशन जारी करत निर्णय जाहीर केल्याने आज शनिवारी लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरू होतात बाजारभावात घसरण झाल्याने महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक होत कांद्याचे लिलाव बंद पाडले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

यावेेळी माध्यमांशी बोलताना विदेशातील कांदा उत्पादकांचा कांदा हा साठवणुकीवर कुठलेही मर्यादा न ठेवता खुल्या पद्धतीने कांदा आयात करण्यासाठी मुभा दिल्याने नाराजी व्यक्त करत देशातील कांदा उत्पादकांचा कांदा हा देशद्रोही शेतकऱ्याचा आहे का? असा सवाल करत कांद्यावरील सर्व निर्बंध त्वरित मागे घ्या, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलनाला सामोरे जाण्याचा इशारा भारत दिघोळे यांनी यावेळी दिला.

यावेळी बाजार समिती प्रशासनाने महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कांद्याचे लिलाव पूर्ववत करण्यासाठी विनंती केली असता ही विनंती मान्य परत कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू करण्यात आले. यावेळी लासलगाव बाजार समितीत १६० वाहनातून उन्हाळ कांद्याची १७०० क्विंटल आवक झाली. त्याला जास्तीत जास्त ५८०० रुपये, सरासरी ५३०० रुपये तर कमीतकमी १५०० रुपये इतका प्रतिक्विंटलला बाजारभाव मिळाले तर नवीन लाल कांद्याची १९ वाहनातून २०० क्विंटल कांद्याची आवक झाली त्याला जास्तीतजास्त ४२०० रुपये, सरासरी ३७०० रुपये तर कमीतकमी १४०१ रुपये प्रतिक्विंटलला बाजार भाव मिळाला.

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आमच्या शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. लासलगाव बाजार समितीत शुक्रवारी ६ हजार ९०० रुपये इतका उच्चांकी बाजारभाव मिळाला होता. त्यातीलच आज कांदा विक्रीला आणला असता त्याला ५ हजार १२५ रुपये इतका बाजार भाव मिळाला आहे. केंद्र सरकारने मदत करणे राहिले दूर मात्र चुकीच्या निर्णयामुळे मला २ हजार रुपये प्रति क्विंटलमागे नुकसान सहन करावे लागले.

दत्तात्रेय जाधव, कांदा उत्पादक शेतकरी, येवला