the patient was suicide in district covid 19 hospital in jalgaon
कोविड रूग्णालयात (covid hospital) पेशंटने घेतला गळफास

जळगाव : येथील जिल्हा (district) कोविड रुग्णालयात (covid 19 hospital) कोरोनावर (corona virus) उपचार घेत असलेल्या एका रुग्णाने गळफास (noose) घेऊन आत्महत्या ( suicide) केल्याचे उघडकीस आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या जिल्हा कोविड रुग्णालयात कडुबा नकुल घोंगडे (५०, रा. पहूर, ता. जामनेर) या कोरोना बाधित रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या रुग्णाने मध्यरात्रीनंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बर्‍याच वेळानंतर कर्मचार्‍यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. वॉर्ड क्रमांक सहामध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे.

जिल्हा रूग्णालयातील स्वच्छतागृहात महिलेचा मृतदेह अनेक दिवस पडून राहिल्याचे उघडकीस आल्याने देशभरात याची चर्चा झाली होती. यानंतर पहूरच्या रूग्णाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित रुग्णाने हा प्रकार नेमका कोणत्या कारणाने केला ? त्याने काही सुसाईड नोट लिहून ठेवली आहे की नाही ? याबाबत पोलिसांनी प्राथमिक तपासणी सुरू केली आहे.