The SMS system in the public distribution system is closed
सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील एसएमएस प्रणालीच बंद

  • समित्यांच्या पुनर्गठनाची चित्रा वाघ यांची मागणी

नाशिक : गरिबांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील ( public distribution system) पारदर्शकतेसाठी सुरु करण्यात आलेली ‘एसएमएस प्रणालीच (SMS system) सध्या बंद झाली आहे. ही प्रणाली बंद झाल्यामुळे पक्षता समित्यांच्या सदस्यांना धान्याचे वितरण (grains distribution) व अन्य गोष्टींची माहिती (information) उपलब्ध होण्याचा मार्ग बंद झाला. याविषयी अनेक वेळा तक्रारीदेखील येत आहेत. खरोखरच या व्यवस्थेतील भ्रष्टाचार (corruption) रोखायचा असेल तर एसएमएस प्रणाली पूर्ववत सुरु करावी आणि दक्षता समित्यांचे पुनर्गठण करावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या(bjp) नेत्या (leader) चित्रा वाघ (chitra wagh) यांनी राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री (Minister of Food and Supplies) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्था ही गरीबांची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे या व्यवस्थेचे कामकाज अधिक पारदर्शी होण्याची गरज आहे. त्यासाठी कार्यरत असलेल्या दक्षता समित्यांचे पुर्नगठन करण्याची गरज आहे, हे पुर्नगठन करतांना गावातील तसेच प्रभागातील नियमित लाभार्थ्यांना समाविष्ट करायला हवे. रेशनिंग व्यवस्थेतील धान्य, शिधावस्तूंची गळती, भ्रष्टाचार, कार्डधारकांची फसवणूक, नियमांविषयी, अधिकारांविषयी लोकांमध्ये असणारे अज्ञान, संदिग्धता यांसारख्या त्रुटी दूर करण्यासाठी तसेच पारदर्शक व्यवस्थेसाठी आमच्या मागण्यांचा गांभियान विचार करावा.

रेशन व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा २०१३ नुसार स्थानिक पातळीवर रेशन दक्षता समितीच्या सदस्यांना दुकानात येणारे धान्य किती आणि ते दुकानदाराकडे कधी आले, याची माहिती एसएमएसद्वारे मिळत होती. दुकानात धान्य आल्यावर ते उतरवून घेताना स्थानिक प्रशासक आणि रेशन दक्षता समिती यांच्या देखरेखी खालीच धान्य दुकानात उतरवले जात असे. सध्या या दोन्ही प्रणाली बंद आहेत. त्याचप्रमाणे राज्यभरातील रेशन दक्षता समितीचे ही पुनर्गठन करण्यात आलेले नाही. या दोन्ही प्रणाली सुधारित आणि नव्या माध्यमात पुन्हा सुरु व्हाव्यात अशी आमची मागणी आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सर्व कार्डधारकांना त्यांच्या फोनवर त्यांच्या दुकानात धान्य आल्याची माहिती पाठवली जावी. राज्यभरातील रेशन दक्षता समित्यांचे पुनर्गठण करून त्यांचे बळकटीकरण करावे. तक्रारमुक्त आणि पारदर्शक रेशन व्यवस्थेचे ध्येय यातून साध्य होऊ शकेल. त्यामुळे लवकरात लवकर ही प्रणाली सुरू करण्याची मागणी वाघ यांनी केली आहे.