The ST bus landed on the side of the road due to brake failure The driver's foresight averted a major accident
ब्रेक निकामी झाल्याने एसटी बस रस्त्याच्या कडेला उतरली; चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली

शुक्रवारी संध्याकाळी राज्य परिवहन मंडळाच्या कसारा-नाशिक बसचा ब्रेक नादुरुस्त झाल्याने ही बस कसारा गावातील मुख्य रस्त्याच्या कडेला नाल्यात उतरली. चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली.

कसारा : शुक्रवारी संध्याकाळी राज्य परिवहन मंडळाच्या कसारा-नाशिक बसचा ब्रेक नादुरुस्त झाल्याने ही बस कसारा गावातील मुख्य रस्त्याच्या कडेला नाल्यात उतरली. चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली.

इगतपुरी आगाराची एमएच १२ ईएफ ६८३५ क्रमांकाची एसटी बस कसारा येथून संध्याकाळी सहाच्या सुमारास प्रवासी घेऊन नाशिककडे जाण्यास निघाली होती. दरम्यान बसचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाने प्रसंगावधान दाखवत बस शिवमंदिराच्या समोर असलेल्या संरक्षण भिंतीचा आधार घेत रस्त्याच्या कडेला उतरवली. तीव्र उताराचा रस्ता असल्याने व नेहमीच वाहनांच्या वर्दळीच ठिकाण असलेल्या रस्त्यावर वाहन नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

बसमध्ये तीसहून अधिक प्रवाशी होते. मात्र सुदैवाने कुठलीही दुखापत झाली नाही. इगतपुरी आगारातून अशी नादुरुस्त असलेली बस बाहेर कशी काढण्यात आली. एवढा निष्काळजीपणा प्रवाशांच्या अंगाशी आला असता तर मोठी घटना घडली असती, तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल प्रवाशी व स्थानिकांकडून उपस्थित करण्यात आला.