औद्योगिक क्षेत्रांमधल्या रुग्णांसाठी बोईसर परिसरात २०० बेड चे रुग्णालय निर्माण करावं : जिल्हाधिकारी शिंदे

पालघर जिल्ह्यात कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असून जिल्ह्यांमधून बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे तारापूर औद्योगिक क्षेत्रांत( Tarapur industrial area) औद्योगिक व्यवस्थापनाच्या मदतीनं बोईसर आणि परिसरात २०० बेड डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर (Dedicatedcovid health centre) करावं अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिली.

पालघर : पालघर जिल्ह्यात कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असून जिल्ह्यांमधून बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे तारापूर औद्योगिक क्षेत्रांत( Tarapur industrial area) औद्योगिक व्यवस्थापनाच्या मदतीनं बोईसर आणि परिसरात २०० बेड डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर (Dedicatedcovid health centre) करावं अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिली. त्याचबरोबर पालघर तालुक्यातल्या कांबळगाव इथल्या (CCC) कोव्हीड केअर सेंटर चं मजबुतीकरण करणं आणि बोईसर च्या टिमा रुग्णालयात संपूर्ण ४० बेड आयसीयू करण्यात यावे अशा सूचना देखील जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.

जिल्हाधिकारी यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. या सुविधा निर्माण करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. औद्योगिक व्यवस्थापनानं या सुविधा निर्माण करावयाच्या असून संपूर्ण सहकार्य करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी आवाहन केलं आहे. तसचं औद्योगिक व्यवस्थापनाकडे असणाऱ्या ॲम्बुलन्स कोव्हीड रुग्णांच्या सेवेसाठी बोईसर इथं उपलब्ध करून द्याव्यात अशी सूचना ही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
या बैठकीत प्रांताधिकारी, सहसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य वसई, उपायुक्त कामगार बोईसर, उप अभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ बोईसर, उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर -१ व २ तसेच विराज प्रोफाइल प्रा. लि. टाटा स्टील प्रा. लि. जेएसडब्ल्यू प्रा.लि., लुपिन लिमिटेड बोईसर, निऑन फाउंडेशन पालघर, आरती ड्रग्स कम्पनी, अध्यक्ष, तारापूर औद्योगिक व्यवस्थापन असोसिएशन (टिमा) आदी सहभागी झाले होते. तसचं यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ.किरण महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक कांचन वानेरे आणि इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.