गणपतीसाठी कोकणात गेलेल्या 272 जणांना कोरोनाची लागण, जिल्हाधिकारी कार्यालयाची माहिती

आता या 272 कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यात येत असून, त्यासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांची आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्याने कोकणवासियांची चिंता वाढली आहे.

    रत्नागिरी : Konkan corona Crisis : गणपतीसाठी Ganpati festival गावाला आलेल्या 272 जणांना कोरोनाची लागण 272 corona positive in Konkan झाल्याची माहिती रत्नागिरी Ratnagiri व सिंधुदुर्ग Sindhudurg जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता कोकण वासियांची चिंता वाढली आहे.

    गणेशोत्सवात कोकणात गेलेल्या अनेकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 272 जणांना कोरोना झाल्याचे पुढे आले आहे. कोरोना चाचणीमध्ये रत्नागिरीत 120 तर सिंधुदुर्गात 152 रुग्ण आढळून आले आहेत.

    गणेशोत्सवानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या १ लाख ३० हजार जणांपैकी ९० हजार जण करोना चाचणी करून आणि दोन लसमात्रा घेऊन आलेले होते. ४० हजार जण चाचणीसाठी पात्र होते; परंतु त्यातील साधारण  २० हजार जण १८ वर्षांखालील होते, अशी माहिती रत्नागिरी जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी दिली. उर्वरित २० हजार जणांपैकी १२० जणांना करोनाची लागण झाल्याचे चाचणीत आढळून आले. त्याव्यतिरिक्त ७२ जणांना करोनासदृश लक्षणे होती. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

    दरम्यान, आता या 272 कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यात येत असून, त्यासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांची आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्याने कोकणवासियांची चिंता वाढली आहे.