कल्याण डोंबिवलीत  ३२० नवे रुग्ण; तर ८ जणांचा मृत्यू

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ३२० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ८ जणांचा मृत्यू झाला असून ३४१ जणांना गेल्या २४ तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या या ३२० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या २४,४२० झाली आहे.

२४,४२०  एकूण रुग्ण तर ४९७ जणांचा आतापर्यंत मृत्यू

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ३२० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ८ जणांचा मृत्यू झाला असून ३४१ जणांना गेल्या २४ तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या या ३२० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या २४,४२० झाली आहे. यामध्ये ३७७० रुग्ण उपचार घेत असून २०,१५३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ४९७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजच्या ३२० रूग्णांमध्ये कल्याण पूर्व  ४८,  कल्याण प.७६,  डोंबिवली पूर्व ११७,  डोंबिवली प. ६०, मांडा टिटवाळा १४, मोहना ४ तर पिसवली येथील एका रुग्णाचा समावेश आहे. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी  १२० रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १७ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ९   रुग्ण बाज आर. आर. रूग्णालयामधून, २ रुग्ण हॉलीक्रॉस रुग्णालयातून,  ८ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटर मधून, ७ रुग्ण शास्त्री नगर रुग्णालयातून  डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.