vaccine corona virus

राज्यात आज ११ हजार ५४१ रुग्ण(covid 19) बरे झाले तर १६ हजार ८६७ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.५८ टक्के आहे.

मुंबई : राज्यात आज ११ हजार ५४१ रुग्ण(covid 19) बरे झाले तर १६ हजार ८६७ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.५८ टक्के आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ५४ हजार ७११ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ८५ हजार १३१ रुग्णांवर (active) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज निदान झालेले १६,८६७ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ३२८ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१४३२ (३१), ठाणे- २४६ (७), ठाणे मनपा-२१९ (१३), नवी मुंबई मनपा-४०६ (९), कल्याण डोंबिवली मनपा-३५५, उल्हासनगर मनपा-३९, भिवंडी निजामपूर मनपा-१६, मीरा भाईंदर मनपा-१७१ (९), पालघर-१३५ (१), वसई-विरार मनपा-१६५ (६), रायगड-३५१ (२१),पनवेल मनपा-२७०, नाशिक-३१० (५), नाशिक मनपा-७९६ (११), मालेगाव मनपा-५६, अहमदनगर-३५४ (४),अहमदनगर मनपा-२९० (४), धुळे-७५ (२), धुळे मनपा-११८ (१), जळगाव- ६९३ (१६), जळगाव मनपा-१८६ (४), नंदूरबार-६० (१), पुणे- ९५८ (११), पुणे मनपा-१९७२ (३२), पिंपरी चिंचवड मनपा-११३२ (४), सोलापूर-४५५ (८), सोलापूर मनपा-५५ (१), सातारा-७२० (६), कोल्हापूर-४३५ (१२), कोल्हापूर मनपा-२३४ (३), सांगली-२६८ (१२), सांगली मिरज कुपवाड मनपा-२५१ (११), सिंधुदूर्ग-३२, रत्नागिरी-७४ (३), औरंगाबाद-९७ (१),औरंगाबाद मनपा-२४६ (२), जालना-७२ (२), हिंगोली-४८ (१), परभणी-३३, परभणी मनपा-४५ (१), लातूर-९९ (५), लातूर मनपा-९३ (३), उस्मानाबाद-१६७ (३),बीड-१०६ (६), नांदेड-२०१ (९), नांदेड मनपा-१०० (६), अकोला-३४, अकोला मनपा-१३ (१), अमरावती-१०१, अमरावती मनपा-२८ (४) , यवतमाळ-११८, बुलढाणा-११० (१), वाशिम-३३ , नागपूर-३३१ (४), नागपूर मनपा-१०७० (२७), वर्धा-५५ (१), भंडारा-५८, गोंदिया-९७ (१), चंद्रपूर-८७ (१), चंद्रपूर मनपा-६५ (१), गडचिरोली-१२, इतर राज्य १९.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४० लाख १० हजार २०० नमुन्यांपैकी ७ लाख ६४ हजार २८१ नमुने पॉझिटिव्ह (१९.०५ टक्के) आले आहेत. राज्यात १३ लाख १२ हजार ०५९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ५२४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३२८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.१५ टक्के एवढा आहे.