रायगड जिल्ह्यात ५१४ नवीन कोरोनाचे रुग्ण; ८ जणांचा मृत्यू

रायगड जिल्ह्यात रविवार ३० ऑगस्ट   रोजी ५१४   नवीन रुग्ण   आढळले  असून ८  जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३२१  रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत.

३२१ रुग्णाची कोरोनावर मात
पनवेल : रायगड जिल्ह्यात रविवार ३० ऑगस्ट   रोजी ५१४   नवीन रुग्ण   आढळले  असून ८  जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३२१  रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत.रायगड जिल्ह्यात  कोरोंनाच्या रुग्णांची  एकूण संख्या २७१३७  झाली असून जिल्ह्यात ८००  जणांचा मृत्यू झाला आहे.

रायगड जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे ५१४   नवीन रुग्ण सापडले असून ३२१   जणांनी कोरोंनावर मात केली आहे . पनवेल तालुक्यात २७८    नवीन रुग्ण आढळले   असून पनवेल महापालिका क्षेत्रात २१८   नवीन रुग्ण आढळले  आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात १ , पनवेल ग्रामीण २, कर्जत , पेण , अलिबाग , सुधागड आणी महाड   येथील एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे .

पनवेल ग्रामीण मध्ये ६०, अलिबाग ४३ ,माणगाव ३८ , पेण २७ , महाड २६ , खालापूर २० ,उरण २०, रोहा २० , कर्जत १९ , सुधागड ११, मुरुड ७, पोलादापूर ४ आणि  श्रीवर्धन मध्ये एक  रुग्ण  आढळला   आहे.  रायगड जिल्ह्यात ९४३३५  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी २७१३७   पॉझिटिव्ह आल्या आहेत १९८  टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोंनावर २२८४५   जणांनी मात केली असून ३४९२  रुग्णावर उपचार सुरू आहेत  जिल्ह्यात ८००  जणांचा कोरोंनामुळे मृत्यू झाला आहे.