पोलीस विभागाच्या सतर्कतेने वाचले एका महिला व तिच्या बाळाचे प्राण..

पाली सुधागड येथील आंबा नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्यास गेलेल्या एका महिलेला तिच्या लहान बाळा समवेत प्रसंगावधान बाळगून आपल्या कर्तव्यावर गस्त असलेले पोलीस कर्मचारी यांनी  आत्महत्या (suicide attempt) करण्यापासून वाचवले. त्यामुळे महिलेसोबत चिमुरड्या बाळाचे प्राण देखील वाचले आहे.  

पाली : पाली सुधागड येथील आंबा नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्यास गेलेल्या एका महिलेला तिच्या लहान बाळा समवेत प्रसंगावधान बाळगून आपल्या कर्तव्यावर गस्त असलेले पोलीस कर्मचारी यांनी  आत्महत्या (suicide attempt) करण्यापासून वाचवले. त्यामुळे महिलेसोबत चिमुरड्या बाळाचे प्राण देखील वाचले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,रविवारी (दि.३०)सकाळी १० वा. च्या सुमारास २४ वर्षीय महिला नयना बाळू वालेकर (रा.वावलोली आदिवासी वाडी)  आपले दीड वर्षाचे बाळ प्रणय बाळू वालेकर याला सोबत घेऊन  पाली आंबा नदीवरील पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्यास गेली होती. त्यादरम्यान त्याठिकाणी आपले कर्तव्य बजावत असलेले पोलीस हवालदार (२१७५) नरेश मोरे यांच्या हि बाब निदर्शनास आली, त्यांनी त्या महिलेस प्रसंगावधान बाळगून तिला अडवलं.आत्महत्या करण्यापासून तिचं मन परिवर्तन,मत परिवर्तन करून तिला आत्महत्या करण्यापासून रोखून सुरक्षितरीत्या पाली पोलीस ठाण्यात आणले. सदर महिला हिने दिलेल्या माहितीनुसार घरातील कौटुंबिक वादामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे पोलीस ठाण्यात सांगितले. सदर महिलेचे पती,सासू सासरे यांना पाली पोलीस ठाण्यात बोलावून पुढील चौकशी करण्यात येणार असल्याचे पाली पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी सांगितले. परंतु पोलीस विभागाच्या या सतर्कतेमुळे एक महिलेसोबत लहान बाळाचे प्राण वाचले त्यामुळे पोलीस विभागाच्या या कौतुकास्पद कामगिरी बद्दल सर्व स्थरावरून अभिनंदन होत आहे.