बसवरील नियंत्रण सुटल्याने ५०० फूट दरीत कोसळली एसटी बस, अपघातात दोन जण गंभीर जखमी

बुधवारी रात्री दहा ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी आगाराची मालवाहतूक बस क्रमांक (एम. एच. २० बी. एल ०४२९) माणगावहुन कलिंगडे भरून सांगलीकडे चालली होती. केळघर घाटात ही बस रात्री दहा वाजण्याच्या सुमारास रेंगडी गावच्या हद्दीत काळा कडा येथे एका अवघड वळणावर आली असता चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने व बसवरील नियंत्रण सुटल्याने बस अंदाजे ५०० फूट खोल दरीत कोसळली.

    केळघर : केळघर घाटातील काळा कडा येथे बुधवारी रात्री ५०० फूट दरीत एसटी बस कोसळल्याची माहिती मिळाली आहे. केळघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोचल्याने जखमींना पुढील उपचारासाठी सातारा येथे खासगी रुग्णालयात वेळेत नेता आले. झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. देवरुख आगाराचे चालक मयूर पावनिकर (वय ४०), रामकिशन केंडे (वय ४२) असे जखमींची नावे आहेत. हा अपघात झाल्यानंतर मुकवली माची येथील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना दरीतून वर काढले.

    मेढा पोलिस ठाण्यातून व घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री दहा ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी आगाराची मालवाहतूक बस क्रमांक (एम. एच. २० बी. एल ०४२९) माणगावहुन कलिंगडे भरून सांगलीकडे चालली होती. केळघर घाटात ही बस रात्री दहा वाजण्याच्या सुमारास रेंगडी गावच्या हद्दीत काळा कडा येथे एका अवघड वळणावर आली असता चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने व बसवरील नियंत्रण सुटल्याने बस अंदाजे ५०० फूट खोल दरीत कोसळली.

    दरम्यान, स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदत केल्याने या चालकांचे प्राण वाचले. यामुळे या चालकांना वेळेत उपचार मिळाले. आज (गुरुवार) घटनास्थळी विभाग नियंत्रक सागर पळसुले, विभाग यंत्र अभियंता श्री. मोहिते यांनी भेट देऊन अपघाताची सविस्तर माहिती घेतली. या अपघाताचा अधिक तपास पोलीस करत आहेत.