डोंबिवलीच्या प्रभाग क्र. २६ मधील नागरिकांची अँटीजेन टेस्ट

कल्याण डोंबिवली मधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरेश मित्र मंडळ व कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या सौजन्याने, माझा प्रभाग माझी जबाबदारी हे डोळ्या समोर ठेवून प्रभाग क्रमांक २६ रामबाग खडक मधील नागरिकांची मोफत अँटीजेन टेस्ट करण्यात आली.

कल्याण : कल्याण डोंबिवली मधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी  सुरेश मित्र मंडळ व कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या सौजन्याने, माझा प्रभाग माझी जबाबदारी हे डोळ्या समोर ठेवून  प्रभाग क्रमांक २६  रामबाग खडक मधील नागरिकांची मोफत अँटीजेन टेस्ट करण्यात आली.

       प्रभागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभाग क्रमांक २६ रामबाग खडक येथे कल्याण डोंबिवली महानगरपालिका आरोग्य केंद्रा मार्फत व सुरेश मित्र मंडळ यांच्यातर्फे नागरिकांसाठी मोफत टेस्ट अँटीजेन ठेवण्यात आली होती. ज्या लोकांना सर्दी, खोकला, घसा खवखवणे, तसेच कोरोना पॉझिटिव व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या वॉर्डातील नागरिकांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली.  

या शिबिरात ५० ते ६० लोकांच्या अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या. त्यापैकी १३ ते १५ लोकं पॉझिटिव्ह आले. आपण घाबरू नका स्वतः पुढे येऊन कोरोना टेस्ट करा आणि सरकारला मदत करा आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. लक्षणे वाटल्यास चेक करा आवाहन मनविसे शहर अध्यक्ष विनोद केणे यांनी नागरिकांना केले आहे.

 

या शिबिराचे आयोजन करण्यासाठी  म.न वि.से शहर अध्यक्ष विनोद केणे, सुरेश मित्र मंडळाचे अध्यक्ष रमेश टावरे, उपविभाग अध्यक्ष सुनील वाडकर, शाखा अध्यक्ष मिलिंद चौधरी, विजय जाधव, प्रदीप पाटील, श्रीकांत पाठारे, योगेश घोलप, दीपक सिन्हा, प्रमोद वाहीरे, विजय जाधव, हर्ष गांगुर्डे (विभाग अध्यक्ष म. न. वि. से), कानेश्वर नाईक( शाखा अध्यक्ष म. न. वि.से), तेजस पाटील (उपशाखा अध्यक्ष), इंद्रजीत कुलकर्णी (उपशाखा अध्यक्ष), रवी जाधव(उपशाखा अध्यक्ष), राहुल सुर्वे (उपशाखा अध्यक्ष), मिलिंद उर्दरवशी  आदी मनसे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.

यावेळी माजी आमदार प्रकाश भोईर(प्रदेश सरचिटणीस), उल्हास भोईर( जिल्हा अध्यक्ष), महेश मोरे(शहर सचिव), रोहन आक्केवार(शहर संघटक रस्ते आस्थापना),  गणेश चौधरी ( उपशहर अध्यक्ष), गौरव जाधव(विभाग अध्यक्ष), सागर चाळसे(चिटणीस कामगार सेना), वैभव देसाई (शाखा अध्यक्ष) आदी पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी रमेश केणे यांचं प्रमुख सहकार्य लाभले आहे.