मृत्यूदर कमी करण्यासाठी संशयित रुग्णांनी लवकर चाचणी करण्याचे आवाहन

पालघर जिल्ह्यात कोव्हिडं-१९ च्या संसर्गानं मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ही गोष्ट चिंताजनक आहे. जर मृत्यूदर कमी करायचा असेल तर संशयित रुग्णांनी लवकरात लवकर चाचणी करून दवाखान्यात दाखल व्हावं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी केलं आहे.

पालघर : पालघर जिल्ह्यात कोव्हिडं-१९ च्या संसर्गानं मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ही गोष्ट चिंताजनक आहे. जर मृत्यूदर कमी करायचा असेल तर संशयित रुग्णांनी लवकरात लवकर चाचणी करून दवाखान्यात दाखल व्हावं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी केलं आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या व्यक्तींपैकी ६०% व्यक्ती ह्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर ७२ तासांमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. यावरून संशयित रुग्ण चाचणी करून घेण्यास पुढे येत नाहीत. त्यानंतर गंभीर परिस्थिती आल्यावर हॉस्पिटलमध्ये दाखल होत असल्यानं उपचार करण्यास पुरेसा कालावधी मिळत नाही.परिणामी रुग्णावर मृत्यू ओढवतो.

यासाठी ज्या गावात अथवा प्रभागात ५ पेक्षा जास्त रुग्ण ऍक्टिव्ह असतील त्या ठिकाणी तपासणी शिबिर लावण्यात येईल. तसचं दररोज ५०० RTPCR आणि २०० हुन अधिक अँटीजन टेस्ट आता करता येऊ शकतील. ज्या रुग्णाला लक्षणं नाहीत परंतु जो कोरोना बाधित आहे अशा रुग्णाला संबंधित तालुक्या मधल्या कोव्हीड केअर सेंटर मध्ये ठेवता येईल.

रिव्हेरा, टिमा, पोशेरी या कोव्हीड रुग्णालयात सेंट्रल ऑक्सिजन टॅन्क बसवण्यास परवानगी मिळाली असून ऑक्सिजन ची सुविधा लवकर उपलब्ध होईल. पुढील आठवड्यापासून डहाणू MRHRU लॅब मध्ये २०० मोफत चाचण्या करता येणार आहेत.

कोणाला काही मदत हवी असेल १८००१२१५५३२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. तसचं प्रत्येक तालुक्याअंतर्गत वॉर रूम स्थापित केल्या आहेत. त्यासाठी covidbed.palghar.info ही लिंक दिली असून याद्वारे कोव्हीड-१९चाचणी, बेड ची उपलब्धता ,घरी विलगीकरण आदी बाबींची माहिती मिळू शकते.