महाडमधील ‘तारीक गार्डन’ मधील बेघर कुटुंबांची राष्ट्रीय स्मारकात व्यवस्था

महाडमधील ‘ तारीक गार्डन ‘ (tarika garden) या कोसळलेल्या इमारतीतील बेघर झालेल्या कुटुंबांची डाॅ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये( dr. Babasaheb Ambedkar National Monument) तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे.

महाड: महाडमधील ‘ तारीक गार्डन ‘ (tarika garden) या कोसळलेल्या इमारतीतील बेघर झालेल्या कुटुंबांची डाॅ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये( dr. Babasaheb Ambedkar National Monument) तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी पन्नास रहिवाशांची राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था नगरपरिषदेकडून करण्यात आलेली आहे .

आज दुपारी या स्मारकातील व्यवस्थेची माजी आमदार माणिक जगताप यांनी पाहणी केली . यावेळी नगराध्यक्षा स्नेहल जगताप , उपनगराध्यक्ष संदीप जाधव , माजी नगराध्यक्ष महमदअली पल्लवकर , नगरसेवक वजीर कोंडीवकर , नगरसेविका हमीदा शेखनाग , प्रमोद महाडीक , मुख्याधिकारी जीवन पाटील , नगरअभियंता सुहास कांबळे , सत्तार तरे ,माजी नगरसेवक आसलम पानसरे , बाबूशेठ जलाल , अख्तर पठाण आदी उपस्थित होते .

या ठिकाणी भोजन , नास्ता आणि चहाची व्यवस्था नगरपरिषदेमार्फत करण्यात आलेली आहे . मागील सोमवारी तारीक गार्डन ही पाच मजली इमारत कोसळून १६ जणांचे बळी गेले असून अनेक कुटुंबे बेघर होऊन त्यांचे संसार उध्वस्त झाली आहेत . या बेघर कुटुंबांची डाॅ आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे.