इंडिया पोस्ट बँकमुळे लाभार्थी शेतकऱ्यांचा निधी मिळणार घरबसल्या

इंडिया पोस्ट बँकमुळे गावातील पोस्टमन ही एक चालतीबोलती बँक असून घरपोच बँकिंग सेवा देणे त्यामुळे डाक विभागात शक्य झाले आहे. त्यामुळे केंद्र शासन तसेच राज्य शासनाच्या लाभार्थी शेतकऱ्यांचा निधी घरबसल्या अगदी कुठेही न जाता त्यांना मिळणार आहे.

 पनवेल : इंडिया पोस्ट बँकमुळे गावातील पोस्टमन ही एक चालतीबोलती बँक असून घरपोच बँकिंग सेवा देणे त्यामुळे डाक विभागात शक्य झाले आहे. त्यामुळे केंद्र शासन तसेच राज्य शासनाच्या लाभार्थी शेतकऱ्यांचा निधी घरबसल्या अगदी कुठेही न जाता त्यांना मिळणार आहे 

         जगातील सर्वात मोठी टपाल जाळे भारतात असल्याने देशातील प्रत्येक गावापर्यंत आणि घरापर्यंत डाक विभाग पोहोचलेला आहे .या सर्वदूर जाण्याचा उपयोग बँक सेवा पुरविण्याचा भारत सरकारचा मानस असून त्यादृष्टीने डाक विभाग नव्या रूपात समोर आलेला आहे. इंडिया पोस्ट बँकमुळे गावातील पोस्टमन ही एक चालतीबोलती बँक असून घरपोच बँकिंग सेवा देणे त्यामुळे डाक विभागात शक्य झाले आहे. केंद्र शासन तसेच राज्य शासन विविध योजनांच्या अनुदान डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करत असतो.  शेतकऱ्यांसाठी असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत नुकतेच देशभरातील ८.५  कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये केंद्र शासनामार्फत जमा करण्यात आलेले आहेत.

          नवी मुंबई विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पनवेल, उरण, कर्जत, खालापूर तालुका अंतर्गत येणाऱ्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांचा निधी घरबसल्या अगदी कुठेही न जाता त्यांना मिळावा म्हणून डाक विभाग कटिबद्ध आहे. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ करून घ्यावा यासाठी त्यांनी जवळच्या पोस्ट ऑफिस सोबत संपर्क साधावा असे आवाहन वरिष्ठ अधीक्षक, डाकघर नवी मुंबई -पनवेल यांनी केले आहे.