
हळूहळू सेवा पूर्ववत होऊ लागल्याने रेल्वे मंत्रालयाने ही गाडी सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. याबाबत कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार तेजस एक्स्प्रेस (०२११९/२०) दि. २० डिसेंबरपासून पुढील सूचना मिळेपर्यंत आठवड्यातून पाच दिवस धावणार आहे.
रत्नागिरी : कोरोना महामारीमुळे जवळपास १० महिन्यांपासून बंद असलेली कोकण रेल्वे मार्गावर धावणारी तेजस एक्स्प्रेस अखेर २० डिसेंबरपासून पुन्हा एकदा धावणार आहे. पूर्वीच्या वेळापत्रकानुसारच आठवड्यातून पाच दिवस ही गाडी धावणार आहे.
देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता २० मार्चपासून रेल्वे सेवाही ठप्प झाली होती. त्या दिवसापासून तेजस एक्स्प्रेसही आजवर बंदच होती. मात्र, आता हळूहळू सेवा पूर्ववत होऊ लागल्याने रेल्वे मंत्रालयाने ही गाडी सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. याबाबत कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार तेजस एक्स्प्रेस (०२११९/२०) दि. २० डिसेंबरपासून पुढील सूचना मिळेपर्यंत आठवड्यातून पाच दिवस धावणार आहे. ही गाडी मुंबईतील सीएसएमटी स्थानकावरु पहाटे ५ वाजून ५० मिनिटांनी सुटेल आणि गोव्यात करमाळीला ती दुपारी २ वाजता पोहोचेल.
त्याच दिवशी ही गाडी दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी करमाळीहून निघून रात्री ११.१५ वाजता सीएसएमटी स्थानकात मुंबईला पोहोचणार आहे. आठवड्यातील सोमवार तसेच गुरुवार वगळून पाच दिवस ही गाडी कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी तसेच सिंधुदुर्गात कुडाळ स्थानकावर थांबणार आहे. एक प्रथम श्रेणी वातानुकूलित चेअरकार तसेच १२ चेअरकार अशा १३ डब्यांसह ही गाडी धावणार आहे.