महाड इमारत दुर्घटनास्थळी निरंकारी सेवादलांचे मदतकार्यात योगदान

नुकतीच झालेल्या महाड शहरातील काजळपुरा येथील पाच मजली तारीक गार्डन(tarika garden) इमारत दुर्घटना (Building accident)स्थळी मदतकार्यात मोलाचे योगदान संत निरंकारी मंडळाच्या सेवादलांनी दिले.

संत निरंकारी मंडळाचे २५ सेवादल झाले होते सहभागी

महाड : नुकतीच झालेल्या महाड शहरातील काजळपुरा येथील पाच मजली तारीक गार्डन(tarika garden) इमारत दुर्घटना (Building accident)स्थळी मदतकार्यात मोलाचे योगदान संत निरंकारी मंडळाच्या सेवादलांनी दिले. संत निरंकारी मंडळ गेली ९० वर्षाहून अधिक काळ मानवतेच्या कार्यात समरस राहून दृष्टिगोचर व्याप्त परमेश्वराची ओळख समस्त मानवमात्राला देऊन खरा भक्तिमार्ग दाखवीत आहे. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात देखील भरीव योगदान देऊन रक्तदान, नेत्रदान, नेत्रचिकित्सा शिबिर, स्वच्छता मोहीम, आपत्कालीन मदत कार्यात संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन कार्यरत आहे. संत निरंकारी मंडळाचे खाकी, निळी वर्दीमधील स्वयंसेवक विविध सेवाकार्यात समर्पित भावाने गुरुकार्याला प्राधाण्य देऊन सेवा करतात.

महाड मधील इमारत दुर्घटनेची माहिती संत निरंकारी मंडळाच्या मुख्य कार्यालय दिल्ली येथे केंद्रीय अधिकारी यांना कळवून तात्काळ सेवेसाठी रायगड झोन इंचार्ज प्रकाश म्हात्रे, रायगड सेवादल क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक प्रवीण पाटील, महाड संयोजक दयाळ पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली महाड युनिट सेवादल संचालक नथुराम निंबरे, शिक्षक अनिल सकपाळ, स.शिक्षक काशिनाथ पवार यांच्या सहकार्याने २५ सेवादलांनी महाड इमारत दुर्घटना घटनास्थळी उपस्थित राहून मदत कार्यात सहभागी झाले होते.

दुर्घटनास्थळी पोहोचल्यानंतर तेथील उपस्थित पोलीस अधिकारी एस पी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जमाव नियंत्रणाकरिता एक टीम बचावकार्यासाठी इमारतीच्या ठिकाणावर दुसरी टीम पाठवण्यात आली. सुरुवातीला त्वरित घटनास्थळी पोहोचलेल्या सेवादलाच्या दोन जवानांनी सहा जणांना जिवंत बाहेर काढण्याकरिता विशेष प्रयत्न केले. रात्रभर सुरू असलेल्या शोध कार्यामध्ये रेस्क्यू ऑपरेशनमध्ये, हॉस्पिटल व इतर सेवा तसेच काही सेवादल रक्त देण्यासाठी रक्तपेढी मध्ये सुद्धा पोहचले होते. आपली सेवा दुसऱ्या दिवसापर्यंत समर्पितपणे चालू ठेवली होती.