शिमगोत्सवावर कोरोनाचे गडद संकट, ग्रामस्थांच्या आनंदावर संकासूर ; गावी जायचं की नाही चाकरमान्यांसाठी मोठा प्रश्न?

यावर्षीही शिमगोत्सवाचे ढोल वाजायला लागले असतानाच कोरोनाचे वादळ पुन्हा एकदा घोंगावू लागले आहे. यंदाही शिमगोत्सवाचा आनंद लुटण्यावर निर्बंध येणार असल्याने शिमगोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी सज्ज झालेल्या ग्रामस्थांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. मुंबईतील चाकरमानी मोठ्या प्रमाणात आपल्या मूळ गावी येण्यासाठी उत्सुक असतात. त्यामुळे शिमगोत्सवासाठी ग्रामदेवतेचे दर्शन घेणे आणि ग्रामदेवतेची पालखी खांद्यावर घेऊन नाचविणे. यामध्ये प्रत्येकाला एक वेगळा आनंद मिळत असतो.

    कोरोना विषाणूचं संकट दिवसागणिक वाढत चाललं आहे. तर दुसरीकडे कोकणातील महत्त्वाच्या सणांपैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे शिमगोत्सव. शिमगोत्सव तोंडावर आला असतानाच कोरोनाचे संकट गडद होऊ लागले आहे. त्यामुळे कोरोना इलो रे…पळा…पळा..! अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळत आहे. तसेच शिमगोत्सवाच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    यावर्षीही शिमगोत्सवाचे ढोल वाजायला लागले असतानाच कोरोनाचे वादळ पुन्हा एकदा घोंगावू लागले आहे. यंदाही शिमगोत्सवाचा आनंद लुटण्यावर निर्बंध येणार असल्याने शिमगोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी सज्ज झालेल्या ग्रामस्थांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. मुंबईतील चाकरमानी मोठ्या प्रमाणात आपल्या मूळ गावी येण्यासाठी उत्सुक असतात. त्यामुळे शिमगोत्सवासाठी ग्रामदेवतेचे दर्शन घेणे आणि ग्रामदेवतेची पालखी खांद्यावर घेऊन नाचविणे. यामध्ये प्रत्येकाला एक वेगळा आनंद मिळत असतो.

    मात्र, शिमगोत्सवाचा उत्सव अगदी जवळ आला असून कोरोनाने पुन्हा आपले बसतान बसवायला सुरूवात केली आहे. त्यामुळे शिमगोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी गावी जायचं की नाही, असा प्रश्न चाकरमान्यांना पडला आहे. परंतु कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी ग्रामस्थांनी शिमगोत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.