भिवंडीतील पंडित चौघुले यांचे निधन

तालुक्यातील वडूनवघर गावाचे माजी सरपंच व राष्ट्रवादीचे जैष्ठ कार्यकर्ते पंडित बाबुराव चौघुले ( ६८ ) यांचे अल्पशा आजाराने रविवारी निधन झाले.

भिवंडी : तालुक्यातील वडूनवघर गावाचे माजी सरपंच व राष्ट्रवादीचे जैष्ठ कार्यकर्ते पंडित बाबुराव चौघुले ( ६८ ) यांचे अल्पशा आजाराने रविवारी निधन झाले. त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून ठाण्याच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. विशेष म्हणजे २५ दिवसांपूर्वीच त्यांचे जैष्ठ बंधू महादेव चौघुले यांचे निधन झाले होते. अवघ्या एका महिन्याच्या आताच दोन्ही चौघुले बंधूंचे निधन झाल्याने चौघुले परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या निधनाने राजकीय व शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.