भिवंडी पालिकेच्या आयुक्तांना निलंबित करण्याची मागणी

भिवंडी महापालिकेच्या वतीने बाई गुलबाई पेटिट नव्या रुग्णालयाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सत्यनारायणाची पूजा घातल्याने पालिकेचे आयुक्त श्री. डॉ. पंकज आशिया त्यांना त्वरित निलंबित करा. अशी मागणी बहुजन विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल वाणी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. 

भिवंडी  :  भिवंडी महापालिकेच्या वतीने बाई गुलबाई पेटिट नव्या रुग्णालयाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सत्यनारायणाची पूजा घातल्याने पालिकेचे आयुक्त श्री. डॉ. पंकज आशिया त्यांना त्वरित निलंबित करा. अशी मागणी बहुजन विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल वाणी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. 

    भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे जुने बाई गुलबाई पेटिट रुग्णालय होते. त्याच जागेवर नव्याने अद्यावत असे रुग्णालय बांधण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. त्या इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम स्वातंत्र्य दिनी घेतला होता. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात ब्राम्हणाला बोलावून सत्यनारायणाची पूजा घालण्यात आली. शासनाच्या कार्यक्रमात कोणत्याही देवा धर्माचे आचरण अथवा पूजा करू नये असे शासनाचे आदेश असतानाही तसेच भारतीय राज्यघटनेने धर्मनिरपेक्ष शासन व्यवस्था स्वीकारली असतानाही भिवंडी महापालिकेच्या आयुक्ताने हिंदू धर्म रितीरिवाजाप्रमाणे सत्यनारायणाची पूजा घातल्याने त्याने शासनाचा व भारतीय राज्यघटनेचा अवमान केला आहे त्यांच्या या कृतीमुळे शहरात बंधुभावाचे व जातीय सलोख्याचे वातावरण बिघडण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे भिवंडी पालिकेच्या आयुक्तांना त्वरित निलंबित करून त्यांची तडकाफडकी बदली करण्यात यावी. अशी मागणी बहुजन विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल वाणी यांनी एका लेखी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई मेल द्वारे करण्यात आली.