निशिकांत कामत यांना उपमुख्यंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

चित्रपट दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या निधनानं सामाजिक प्रश्नांची जाण व चित्रपटांच्या माध्यमातून ते हाताळण्याचं भान असलेला कुशल दिग्दर्शक आपण गमावला आहे.

प्रतिभासंपन्न कलावंताचं अकाली निधन क्लेशदायक

 मुंबई :चित्रपट दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या निधनानं सामाजिक प्रश्नांची जाण व चित्रपटांच्या माध्यमातून ते हाताळण्याचं भान असलेला कुशल दिग्दर्शक आपण गमावला आहे. ‘डोंबिवली फास्ट’ मराठी चित्रपटातून त्यांनी मांडलेलं मध्यमवर्गीय मुंबईकरांचं जीवन असेल किंवा त्यांनी दिग्दर्शित केलेले दृश्यम, मदारी सारखे चित्रपट त्यांच्या प्रतिभेचे दर्शन घडवतात. त्यांच्या निधनानं एक प्रतिभासंपन्न कलावंत अकाली काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाचं वृत्त क्लेशदायक आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  दिग्दर्शक निशिकांत कामत यांना श्रद्धांजली वाहिली आहे.