राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची जिल्हा कार्यकारणी जाहीर

आगामी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुका लक्षात घेत आता सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने देखील संघटना बांधणीसाठी जिल्हाध्यक्ष प्रसाद महाजन यांनी आपली जिल्हा कार्यकारणी शनिवारी जाहीर केली आहे.

कल्याण : आगामी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुका लक्षात घेत आता सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने देखील संघटना बांधणीसाठी जिल्हाध्यक्ष प्रसाद महाजन यांनी आपली जिल्हा कार्यकारणी शनिवारी जाहीर केली आहे.

१५ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कल्याण डोंबिवली शहर जिल्हयातील कार्यकर्त्यांच्या जिल्हा व विधानसभा कार्यकारणी पद नियुक्ती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील, प्रदेशउपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव व विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली  जिल्हा अध्यक्ष प्रसाद महाजन यांच्या नेतृत्वाखाली हि कार्यकारणी घोषित करण्यात आली आहे.  

यामध्ये जिल्हा सरचिटणीस व समन्वयक पदी रोहन साळवे, जिल्हा उपाध्यक्ष पदी हेमंत मिरकुटे, कल्याण पुर्व विधानसभा अध्यक्ष पदी शुभम पांडे, कार्याध्यक्ष पदी साहिल उघाडे, जिल्हा सचिव पदी गौरव उबाळे, जिल्हा संघटक सचिव पदी रोहित कांबळे, अख्तर शेख, आदित्य हेगडे, यश देगडे, कल्याण पुर्व विधानसभा उपाध्यक्ष पदी मोनु साबळे, सरचिटणीस पदी विजय कोरी, सचिव पदी प्रतिक पठारे, संघटक सचिव पदी प्रयास ओव्हाळ या सर्वांची पद नियुक्ती करण्यात आली आहे. 

येणाऱ्या काळात या कार्यकारणीच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली जिल्हातील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले जाणार असून संघटना वाढीसाठी देखील काम करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रसाद महाजन यांनी सांगितले.