कोरोनाच्या संकटातही राज्यात अवयवदानाच्या चळवळीला वेग

मुंबईसह राज्यात कोरोनाच्या संक्रमणला सुरुवात होताच अवयवदानाच्या चळवळीवरही परिणाम झाला होता. पण आता अवयवदानाला पुन्हा वेग येण्यास सुरवात झाली असून गेल्या काही दिवसात ह्रदय प्रत्यारोपणाच्या दोन शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत तर किडनी प्रत्यारोपणाच्या पंधरा आणि लिव्हर प्रत्यारोपणाच्या दहा शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

मुंबई : मुंबईसह राज्यात कोरोनाच्या संक्रमणला सुरुवात होताच अवयवदानाच्या चळवळीवरही परिणाम झाला होता. पण आता अवयवदानाला पुन्हा वेग येण्यास सुरवात झाली असून गेल्या काही दिवसात ह्रदय प्रत्यारोपणाच्या दोन शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत तर किडनी प्रत्यारोपणाच्या पंधरा आणि लिव्हर प्रत्यारोपणाच्या दहा शस्त्रक्रीया झाल्या आहेत. त्यामुळे अवयवाच्या प्रतिक्षेत असलेल्या गरजू रुग्णाला नवीन जीवन मिळाले आहे.

अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी बेळगाव इनरव्हिल क्लबच्यावतीने वेबिनारमध्ये आयोजित केले होते अवयवदान चळवळीतल्या आघाडीच्या कार्यकर्त्या व स्नेहबंधन ट्रस्टच्या मीरा सुरेश यांनी यावेळी अवयवदानातील समज-गैरसमज व जनजागृतीबाबत सादरीकरण केले. कोरोनाच्या काळात सर्व काळजी घेऊन अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया सुरु झाल्या आहेत अवयव प्रत्यारोपण करणा-या डाँक्टर त्यांच्या टीममधील नर्स, टेक्निशियन व इतर संबंधितांना कोविडशी संबंधित कोणताही वैद्यकीय कामे दिली जात नाहीत. अतिशय सुरक्षितपणे व सर्व सुचनांचे पालन करून अवयवप्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया होऊ लागल्या आहेत. त्यामुळे अवयव प्रत्यारोपणाच्या संख्येत वाढ होण्यास सुरवात झाली आहे. म्हणूनच दहा दात्यांकडून अवयवदान झाले आहे. त्यामुळे ह्रदय प्रत्यारोपणापासून किडनी, लिव्हर प्रत्यारोपण यशस्वी होऊन गरजू रुग्णांना नवीन जीवन मिळाले आहे असे मीरा सुरेश म्हणाल्या. या सर्व अवयवप्रत्यारोपणामध्ये विविध रुग्णालयातील डाँक्टर्स, नर्सेस, वाँडबाँय, अँब्युलन्स ड्रायव्हर, तंत्रज्ञ अशी ३०७ आरोग्य सेवकांची टीम कार्यरत होती. कोरोनाच्या संकट काळातही या टीमने अतिशय उत्कृष्ट काम केले. आता त्वचादान व नेत्रदानाचाही सुरवात झाली आहे. कोविडमुळे मृत्यु झाला असेल तर त्वचा व नेत्रदान होत नाही. याबाबतही नवीन मार्गदर्शक तत्वे जारी झाली आहे. त्यांचे पालन करूनच त्वचादान व नेत्रदान केले जाते. अवयवदान चळवळीसाठी सर्वसामान्यांमध्ये अधिक जनजागृतीची गरज असल्याचे मीरा सुरेश म्हणाल्या.