भिवंडीत दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप 

गणरायाच्या आगमनाने वातावरणात प्रसन्नता दरवळलेली असताना रवीवारी भिवंडी शहरात दीड दिवसांच्या लाडक्या ‘‘बाप्पाला’’ गणेश भक्तांनी सोशलडीस्टनचे पालन करीत शाश्रुपूर्व नयनांनी निरोप दिला.

भिवंडी : गणरायाच्या आगमनाने वातावरणात प्रसन्नता दरवळलेली असताना रवीवारी भिवंडी शहरात दीड दिवसांच्या लाडक्या ‘‘बाप्पाला’’ गणेश भक्तांनी सोशलडीस्टनचे पालन करीत शाश्रुपूर्व नयनांनी निरोप दिला.
भिवंडी शहरात व ग्रामीण भागात दीड दिवसांचे सार्वजनिक व घरगुती २२०० शे बाप्पाचे विधीवत वातावरणात विसर्जन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेश मूर्तीचे विसर्जनासाठी अनेक सोसायटीमध्ये पाण्याचे टाक्या ठेऊन त्यामध्ये श्रीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले तर ज्या भाविकांना नदी किंवा तलावात विसर्जन करायचे होते आशा भाविकांना पालिका व पोलिसांच्या वतीने ठराविक वेळ देऊन श्रीच्या मूर्तीचे विसर्जनासाठी टोकन देण्यात आले भाविकांनी कामवारी नदी टिळक घाट ,भादवड तलाव ,वऱ्हाळा तलाव ,कारिवली तलाव ,अकलोली ,वज्रेश्र्री खडवली आदी नद्यांमध्ये विसर्जनाकरिता एकच गर्दी केली.