दीड दिवसाच्या गणरायाला निरोप…..

'गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत दीड दिवसांच्या गणरायाला रविवारी दुपारी विधिवत पणे निरोप देण्यात आला.

महाड : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत दीड दिवसांच्या गणरायाला रविवारी दुपारी विधिवत पणे निरोप देण्यात आला. रविवारी दुपारी दीड दिवसाच्या गणरायाचे सावित्री नदी पात्रात विसर्जन करण्यात आले.
यंदाच्या वर्षी कोरोना महामारी मूळे कोकणात गणेशोत्सव अत्यंत सध्या पध्दतीने साजरा केला जात आहे. शनिवारी लाडक्या गणरायाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले होते. गणेशोत्सवानिमित्त अनेक भक्तगण दरवर्षी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करतात. कोणी पाच दिवस, तर कोणी दहा दिवसांपर्यंत घरात गणेशाची प्रतिष्ठापना करत असतात.
रविवारी गणपती प्रतिष्ठापनेचा दीड दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्याने भाविकांनी सावित्री नदी पात्रात गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करून दीड दिवसांच्या गणरायाला भक्तीमय वातावरणात निरोप दिला. या दीड दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यापूर्वी गणेशभक्तांनी विधिवत पणे गणेशाचे पूजन करुन महाआरती व मोदकाचा नैवेद्य चढवून लाडक्या गणरायाकडे सर्व काही मंगल राहू दे, कोरोना चे संकट लवकर दूर होउदे अशी प्रार्थना करून बाप्पाचे नदीपात्रात विसर्जन करत निरोप दिला.
शेकडो वर्षाची परंपरा असणाऱ्या गणपती उत्सवावर या वर्षी कोरोना महामारीमुळे गणेश भक्ताच्यात प्रचंड नाराजी पसरली आहे. संपूर्ण कोकणात गणपती आणि होलिकोत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. लाखो चारकरमानी या दोन प्रमुख उत्सवासाठी कोकणात दाखल होत असतात. मात्र यावर्षी कमी प्रमाणात चाकरमानी कोकणात आले आहेत.
रविवारी दिड दिवसाच्या गणपती बाप्पाचे साध्या पध्दतीने विसर्जन करण्यात आले. महाड नगरपालिकेच्या वतीने सावित्री नदीवरील सर्व विसर्जन घाटावर सर्व तऱ्हेची तयारी करण्यात आली होती दिवसभर गणेश भक्तांना दंवडीद्वारे विसर्जनाच्या सुचना वारंवार देण्यात येत होत्या जेणे करून उत्सव काळात गर्दी आणि कोरोना संसंर्गाचा प्रादूर्भाव वाढू नये.