मुरुड नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा गीता शेडगे यांचे अल्पशा आजाराने निधन

मुरुड जंजिरा : मुरुड नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा गीता शेडगे यांचे त्यांच्या राहत्या निवासस्थानी वयाच्या ७३ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.

काँग्रेस आय पक्षात असताना संतोष तवसाळकर यांच्या नेतृत्वाखाली बहुमत असताना गीता शेडगे याना सन १९९७ रोजी नगराध्यक्ष म्हणून बसण्याचा सन्मान प्राप्त झाला होता अत्यंत मनमिळावू स्वभाव व सर्व जनतेची कामे तत्परतेने करण्याची त्यांची एक खासियत होती. वृत्तपत्र छायाचित्रकार नितीन शेडगे यांच्या त्या मातोश्री आहेत. त्यांच्या या आकस्मित निधनाने संपूर्ण मुरुड शहरात शोककळा पसरली आहे.

त्यांच्या पश्चात तीन मुली एक मुलगा व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी समाजातील विविध पदाधिकारी नगरसेवक व समाज बांधव पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.