कॅप्टन दीपक साठे यांच्या पार्थिवावर विक्रोळीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

केरळ मधील कोझिकोड विमानतळावर धावपट्टी वरून विमान घसरून शुक्रवारी झालेल्या अपघातात कॅप्टन दीपक साठे यांचा मृत्यू झाला होता.

मुंबई :  केरळ मधील कोझिकोड विमानतळावर धावपट्टी वरून विमान घसरून शुक्रवारी झालेल्या अपघातात कॅप्टन दीपक साठे यांचा मृत्यू झाला होता. दीपक साठे यांनी स्वत:चे कौशल्य पणाला लावत विमान स्वत:च्या बाजूने जमिनीकडे नेले. यामुळे शेकडो प्रवाशांचे जीव वाचले. यात त्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. साठे हे मुंबईच्या चांदिवलीचे रहिवासी होते. त्यांचे पार्थिव रविवारी मुंबईत आणण्यात आले होते आणि वांद्रेतील भाभा रूग्णालयात ठेवण्यात आले होते. आज त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील विक्रोळी पूर्वेला असलेल्या टागोरनगर ग्रुप नंबर ७ या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानभूमीत साठे कुटुंबिय उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी दिपक साठे यांना मानवंदना दिली.