मुंबईत पावसाचा जोर कायम; मंत्रालयासमोर कोसळले झाड

मुंबई : सध्या शहरात पावसाने चांगला जोर धरला आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व व पश्चिम भागात देखील पाऊस वाढत चालला आहे. सलग दोन दिवस पडणाऱ्या या पावसाने नागरिकांची दमछाक झाली आहे.

मुंबई : सध्या शहरात पावसाने चांगला जोर धरला आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व व पश्चिम भागात देखील पाऊस वाढत चालला आहे. सलग दोन दिवस पडणाऱ्या या पावसाने नागरिकांची दमछाक झाली आहे. पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचून रस्ते बंद पडले आहेत. सोमवारी रात्री सुरू झालेल्या या पावसाने मंगळवार दुपारपर्यंत शहराचे अनेक रस्ते बंद करून टाकले. 

तसेच या पाऊस आणि वाऱ्यामुळे शहरात ठिकठिकाणी झाडे देखील पडली आहेत. पावसासोबत तुफान वारा सुरू झाल्याने ही झाडे पडत आहेत. अशातच मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर मोठे झाड कोसळले असल्याने नुकसान झाले आहे. शहरात ठिकठिकाणी पावसाचा जोर वाढत असून  येत्या २४ तासांमध्ये मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, मुंबई आणि काही भागात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.